गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

सुभाषित-हिंदी १

                             सुभाषित-हिंदी १

काशिजीकी कला गई
५ किरण सिंहणी सी चढी
४ जलसे पतला कौन है 
६ देश धरम के वास्ते
२ पुण्य पर उपकार
३ मुझे तुम तोड लेना वनमाली 
७  हमें तो अपनोंने लूटा


काशिजीकी कला गई
मथुरा मशीद हुई  |
अगर शिवाजी न होतो तो
सुनती होती सबकी ||

१ भावार्थ :- काशीचे पावित्र्य गेले . मथुरेचे मशिदीत रुपांतर झाले . जर शिवाजी महाराज झाले नसते तर सर्वांची सुंता झाली असती .

पुण्य पर उपकार | 
पाप परपीडा ।।

२ भावार्थ :-  दुसऱ्यावर उपकार करणे याला  पुण्य म्हणतात . दुसऱ्याला त्रास देणे यालाच पाप म्हणतात.


मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।।  

३ भावार्थ :- फुल परमेश्वराला सांगतेय . तू मला तोड आणि अशा रस्त्यावर फेकून दे कि ज्यावरून देशासाठी मृत्यू स्वीकारणारे वीर जात असतात.

प्रश्न :- जलसे पतला कौन है ? कौन भूमि से भारी ?
कौन अगन से तेज है ? कौन काजल से काली ?
उत्तर :- जलसे पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी 
क्रोध अगन से तेज है और कलंक काजल से काली 

४ भावार्थ :- पाण्यापेक्षा पातळ कोण आहे  ? कोण जमिनीपेक्षा वजनदार आहे  ? कोण अग्नीपेक्षा दाहक आहे  ? कोण काजळापेक्षा काळा आहे ? पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे.  पाप जमिनीपेक्षा वजनदार आहे.  राग अग्नीपेक्षा दाहक आहे.  कलंक काजळापेक्षा काळा आहे. 

 

               किरण सिंहणी सी चढी उर पर खींच कटार ।
               भीख मांगता प्राण की अकबर हाथ पसार ॥

५  भावार्थ :- कट्यार उगारून किरण सिंहिणीसारखी छाताडावरती चढली. आणि हात पसरून अकबर प्राणांची भीक मागू लागला . 


            देश धरम के वास्ते वार दिये सुत चार ।

            चार मरे तो क्या हुआ ये जिवित कई हजार ॥


६  भावार्थ :- देश आणि धर्मासाठी चार पुत्रांचे समर्पण केले . चारांचे बलिदान झाले म्हणून काय झाले ? काही हजार पुत्र जिवंत आहेत . 

            हमें तो अपनोंने लूटा, गैरोंमें कहां दम था ।
            हमारी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था ॥

७  भावार्थ :- आम्हाला आमच्याच माणसांनी लुटले. परकियांमध्ये कुठे ताकद होती  !  आमची होडी तिथे बुडली, जिथे पाणीच कमी होते . 

            कंकड पत्थर जोरीके मस्जिद लई चुनाय ।
            ताचडी मुल्ला बांग दे क्या बहिरा हुअा खुदाय ।।
                                                  संत कबीर

८  भावार्थ :- दगड धोंडे जोडून मोठी मशीद बनविली. त्यावर चढून मुल्ला बांग देतोय, अल्ला बहिरा झाला काय  ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा