शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

सुभाषित- संस्कृत १

सुभाषित- संस्कृत  १ 


२८. ओम भूभुवः स्वः
९१ अग्निमीळे पुरोहितं 
७० अगाधजलसञ्चारी
 अग्रतः चतुरान वेदान
५२  अत्रापि भारतं श्रेष्ठं
१८  अनायासेन मरणं
७६ अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं
५७ अमन्त्रं अक्षरं नास्ति
७५ अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं
८३ अवज्ञात्रुटितं प्रेम
५० अव्यापारेषु व्यापारं
४१  अश्वं नैव गजं नैव 
३० अष्टादश पुराणेषु
१०  अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति 
२२  अज्ञ सुखमाराध्यः
८८ अज्ञान तिमिरांधस्य
३५  आरसा शिरसा दृष्ट्या
६८  ईशावास्यं इदं सर्वं 
६६  उत्तमो नातिवक्ता स्यात् 
  उत्तरं यत् समुद्रस्य
४७  उदारस्य तृणं वित्तं
५४  कन्या वरयते रुपम् 
२   कर्मण्येवाधिकारस्ते 
८९ चन्दनं शीतलं लोके
४४  चिन्तनीया हि विपदा
७९ चिन्ता चिता समानाऽस्ति
२४   जलबिन्दुनिपातेन
४८  जानामि धर्मं न च
५८  ततः शंखाश्च भेर्यश्च
४६  त्यजेदेकं कुलस्यार्थे 
६०  दह्यन्ते ध्यायमानानां 
९० दिवि सूर्यसहस्रस्य
५१ देशोद्धाराय कर्तव्यं
३१  दृष्टिपूतं न्यसेत्पादं
५९  धौतिर्बस्तिस्तथा नेति
६३   न कश्चित्  कस्यचित्  
४९  न जातु काम कामानां
६२  नत्वहं कामये राज्यम् 
४  न दैवमिति संचित्य
१५  नरस्याभरणं रूपं
३३  न राज्यं नैव राजाऽसित  
३२  नाभिषेको न संस्कारो
५६  नाहं जानामि केयूरे
२१   निन्दन्तु नीतिनिपुणा यदि 
१२     नैनं छिन्दन्ति शस्त्राणि 
१३     परित्राणाय साधूना 
७२ पक्षिणां बलमाकाशो 
२३   पापान्निवारयति योजयते हिताय
६१  पुनर्वित्तं पुनर्मित्रं
१९     पूर्णमदः पूर्णमिदं
२७  प्रचेतसोऽहं  दशमः पुत्रो
७७ प्रदोषे दीपक: चन्द्र:
    पृथिव्यां त्रीणि रत्नांनि 
४२  बहूनामप्यसाराणां 
२९.  भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा
२०   भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदः
२५   भवन्ति नम्रा स्तरवः फलागमैर् 
८७  मत्स्य-कुर्म-वराह-पुरूषसिंह
     महाजनस्य संसर्गः
३४  मुक्तसंगोऽनहंवादी
४३  यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
१६  यत्र योगेश्वरः कृष्णो
८१ यत्र विद्ववज्जनो नास्ति
८५ यथा खनन् खनित्रेण 
४५  यथा चित्तं तथा वाचः
  येन  बद्धो  बली राजा
 यौवनं  धनसंपत्ति
६९ रामाभिषेके जलमाहरंत्या
५३  राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा
२६  राष्ट्ररक्षासमं पुण्यं
७३ लौकिकानां हि साधूनामर्थं 
१४  वरमेको गुणी पुत्रो
८२ वाच्यं श्रद्धासमेतस्य
१७  वासांसि जीर्णानि यथा विहाय 
७१  विकृतिं नैव गच्छन्ति
११  विद्या ददाति विनयं
६७  विद्या विवादाय धनं मदाय
८० विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य
७८ विना कार्येण ये मूढा
८६ विपदः सन्तु नः शश्वत्तत्र
८४ श्व:कार्यमद्य कुर्वीत
५५  शुरोसि कृतविद्योसि
९२ सकलं तिमिरं हन्तु
७४ साफल्यतालुकोद्घाटनं
६५  स्थानभ्रष्टा न शोभन्ते
 स्नेहं दया च  सौख्यं च
६४  सुखस्यानन्तरं दुःखं


    अग्रतः चतुरान वेदान पृष्ठतः  सशरः  धनुः ।
    इदं शास्त्रं इदं शस्त्रं शापादपि शरादपि ।।
१ भावार्थ :- समोरील चारही वेदांचा मी शास्त्री आहे . पाठीवरील धनुष्याचा मी शस्त्री आहे . या ज्ञानाने, या बलाने दुष्टांना मी शापही देऊ शकतो . वधहि करू शकतो . 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफल हेतुर्भुमाते संगोSस्त्वकर्मणि ।।
२ भावार्थ :- कर्म करणे एवढाच तुझा अधिकार. तू फळाची इच्छा धरू नकोस . ते तुझ्या ताब्यातले नाही . फळाच्या इच्छेने कर्म करू नकोस . काम न करण्याचेही मनात धरू नकोस .

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् |
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र संतति: ||
३ भावार्थ:- समुद्राच्या उत्तरेला व हिमालयासह दक्षिणेला जो प्रदेश आहे त्याला भारत असे नाव असून तिथे राहणारे भारतीय आहेत.

न दैवमिति संचित्य त्यजेदुद्योगमात्मन: ।
अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्य: प्राप्तुमर्हति ।।
४ भावार्थ :- भाग्य आपल्या पाठीशी नाही असा विचार करून कोणीही प्रयत्न सोडू नये. परिश्रम केल्याशिवाय तिळापासून कोण तेल मिळवू शकेल ?

पृथिव्यां त्रीणि रत्नांनि जलमन्नम् सुभाषितम् |
मूढै: पाषाणखंडेशु रत्नसंज्ञा विधीयते ||
भावार्थ :- या पृथ्वीवर तीन अमोलीक रत्ने आहेत. पाणी, अन्न व सुभाषित. अज्ञ लोक मात्र हिरे, माणके अशा दगडाच्या तुकड्यांना रत्न असे नाव देतात.
    महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः  |
  पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्  ||
६ भावार्थ :- मोठ्या माणसांचे सानिध्य फार मोठा लाभ मिळवून देत नाही .  मात्र कमळाच्या पानावरील
थेंबाप्रमाणे आपले हिऱ्यात रुपांतर करतो .

येन  बद्धो  बली राजा  दानवेन्द्रो महाबली |
तेन त्वाम अनुबन्धामि रक्षे मा चल मा चल ||
७ भावार्थ :- राक्षसांचा  महापराक्रमी राजा बली याला  बांधलेली  ही राखी मी तुला  बांधीत  आहे .

    यौवनं  धनसंपत्तिः   प्रभुत्वमविवेकिता  |
    एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयं ||
८ भावार्थ :-  तारुण्य, पैसा, सत्ता आणि  अविचार यापैकी एक गोष्ट देखील अनर्थ घडवून आणायला पुरेशी आहे. आणि या चारही एकवटल्या तर !

    स्नेहं दया च  सौख्यं च यदि वा जानकीमपि  |
    आराधनाय लोकानां मुन्च्यतो नास्ति मे व्यथा ||
९ भावार्थ :-  प्रजेच्या सुखासाठी कोणताही त्याग करण्यास मी दुख: मानणार नाही. प्रेम, दया, सुख, इतकेच नव्हे तर वेळ आल्यास  प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही.

    अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति
    प्रज्ञा च कौल्यं च दमः श्रुतं च।
    पराक्रमश्चाबहुभाषिता च
    दानं यथाशक्ति कृतज्ञता च।।
१० भावार्थ :-  बुद्धि, कुलीनता, इन्द्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, पराक्र, मितभाष्य, शक्ति नुसार दान आणि कृतज्ञता हे  आठ गुण पुरुषाची कीर्ती वाढवितात .

    विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रताम् |
    पात्रत्वाद् धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम् ||
११ भावार्थ :- विद्या विनयला जन्म देते . विनयामुळे व्यक्तीला पात्रता प्राप्त होते . पात्रतेमुळे धन मिळते . धनामुळे धर्माचरण करणे सुलभ बनते . आणि अंततोगत्वा सुखाची प्राप्ती होते .

    नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |
    न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||
१२  भावार्थ :- आत्मा हा शस्त्रांनी कापत नाही, अग्नीने जळत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, तसेच वाराही त्याचे शोषण करू शकत नाही .
 
    परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां |
    धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
१३ . भावार्थ :- सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे संहरण करून धर्मरक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो . 

     वरमेको गुणी पुत्रो न च मूर्खशतान्यपि |
    एकश्चन्द्रस्तमोहन्ति न हि तारागणो S पि च ||
१४ . भावार्थ :- शंभर मूर्ख पुत्रांपेक्षा एकच गुणवान पुत्र असणे इष्ट होय . विशाल तारामंडळ आकाशातील अंधार नष्ट करू शकत नाही . एकटा चंद्र मात्र तो सहज नाहीसा करतो

    नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |
    गुणस्याभरणं ज्ञानम्  ज्ञानस्याभरणं क्षमा ||
१५ . रूप हे माणसाचे भूषण आहे . चांगले गुण हे रूपवान माणसाचे आभरण होय . ज्ञान हे गुणवान माणसाचे भूषण असून क्षमाशीलता हा ज्ञानी माणसाचा अलंकार होय . 

    यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः |
    तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
१६ . जेथे योगेश्वर कृष्ण आहे . जेथे धनुर्धारी अर्जुन, तेथे लक्ष्मी, विजय, नीती, धर्म व वैभव मी नेहमी पाहतो .

     वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृह्याती नरो S पराणि ।
    तथा शरीराणि विहाय जीर्णा । न्यन्यानि संयाति नवानि देही ।।
१७ . जुने वस्त्र टाकून देऊन नवे वस्त्र धारण करतात. त्याचप्रमाणे ( आत्मा ) विकल झालेले शरीर टाकून नव्या देहात प्रवेश करतो .  

     अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।
    देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।
१८ परमेश्वरा, मला त्रास नसलेले मरण, दुःख नसलेले जीवन आणि मरणानंतर तुझा सहवास दे.

     पूर्णमदः पूर्णमिदं । पुर्णात्पुर्णमुदच्यते ।।
    पूर्णस्य पूर्णमादाय  । पूर्णमेवावशिष्यते 
१९ . ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण आले आहे. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण शिल्लक राहते.  

       भद्रमिच्छन्त ऋषयः स्वर्विदः | तपो दिक्षमुपनिषे दुरग्रे |
         ततो राष्ट्रं बलमोजश्चजातम्  | तदस्मै देवा उपसन्नमन्तु  ||
२०. आत्मज्ञानी ऋषींनी सृष्टीच्या प्रारंभी संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा धरून तप केले. त्यातून राष्ट्र निर्माण झाले तसेच राष्ट्रीय बल आणि तेजही निर्माण झाले. म्हणून सर्व देवांनी या राष्ट्रापुढे नम्र होऊन त्याची सेवा करावी. 

        निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु | लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टं |
        अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा | न्यायात्पथः प्रविचलन्ति पदं न धीराः ||
२१. नीतिशास्त्रज्ञ निंदा करोत वा स्तुती करोत, संपत्ती येवो अगर जावो, तत्काळ मरण येवो अथवा कालांतराने येवो, धैर्यवान लोक न्याय्य मार्ग सोडून दूर जात नाहीत. 

    अज्ञ सुखमाराध्यः | सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ||
    ज्ञानलव दुर्विदग्धं | ब्रह्मापि नरं न रज्जयति ||
२२. अज्ञानी माणसाचे समाधान करणे सोपे. ज्ञानी माणसाचे आणि सोपे. पण थोड्या ज्ञानाने फुगलेल्या अर्धवटाचे समाधान ब्रह्मदेवही करू शकत नाही. 

    पापान्निवारयति योजयते हिताय | गुह्यानि गूहति गुणान प्रकटीकरोति ||
    आपद्गतं च न जहाति ददाति काले | सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः ||
२३ जो पापापासून दूर करतो, सत्कार्याला प्रवृत्त करतो, दोष दृष्टिआड करून गुण दाखवितो, संकटात टाकून जात नाही, उलट कठीण प्रसंगी सहाय्य करतो. तोच सन्मित्र असे संत म्हणतात.

    जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
    स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च || 
२४ थेंब थेंब पाण्याने घट पूर्ण भरतो त्याचप्रमाणे माणसाने विद्या, पुण्य (सत्कर्मे) आणि धन मिळवावे.

    भवन्ति नम्रा स्तरवः फलागमैर्  | नवाम्बुभिर्भुरिविलम्बिनो घनाः  ||
    अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः | स्वभाव एवैण परोपकारिणाम्  ||

२५  फळांच्या भाराने वृक्ष वाकतात. नवजलाने मेघ अधिकच खाली येतात. वैभवाने सत्पुरुष नम्र होतात. परोपकारी लोकांचा हा स्वभावच असतो. 

             राष्ट्ररक्षासमं पुण्यं,  राष्ट्ररक्षासमं व्रतं  |
            राष्ट्ररक्षासमं यदन्यो, दृष्टो नैव च नैव च ||
२६ या राष्ट्राचे रक्षण करण्यासारखे पुण्य, व्रत आणि यज्ञ दुसरा कोणताच नाही.  

            प्रचेतसोऽहं  दशमः पुत्रो राघवनन्दन  |
            मनसा कर्मणा वाचा भूतपूर्व न किल्मिषं  ||
२७. हे राम, मी प्रचेता मुनींचा दहावा पुत्र आहे. मी आपल्या जीवनात कधीही मन,वाचा आणि शरीराने पापाचरण केलेले नाही. 

            ओम भूभुवः स्वः  ।
            ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि  ।
            धियो यो नः प्रचोदयात  ।।
२८.  विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. ते सविता देवाचे सर्वश्रेष्ठ असे तेज आहे. त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो. 

            भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः  |
            स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः  ||
२९. हे देवांनो, आम्हाला सदैव चांगले आणि शुभकर बोलच ऐकायला मिळोत. डोळ्यांना देखील चांगले तेच पहावयास मिळो. आमच्या स्थिर झालेल्या अवयवांनी-मनापासून तुमची स्तुती करणारे व्हावे. आम्हाला दीर्घायुष्य लाभो. आमचे मन शुभ गोष्टींकडे आकर्षित केले जाईल अशी प्रेरणा द्या . 

            अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं  |
            परोपकारं हि पुण्याय पापाय परपीडणम्  ||

३०. अठरा पुराणे आणि व्यासांच्या सर्व ग्रंथांचे सार दोन वाक्यांत सांगतात. दुसऱ्यावर उपकार म्हणजे पुण्य. दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे पाप. 

            दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम्  |
            सत्यपूतं वदेत वाचं मनःपूतं समाचरेत्  ||
३१  डोळ्यांनी पाहिलेल्या जागी पाय ठेवावा. वस्त्राने गाळलेले पाणी प्यावे . सत्याला धरून असलेले बोलावे. मनाला पटेल ते योग्य आचरावे . 

            नाभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने  |
            विक्रमार्जित स्वत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता  ||
३२  सिंहाला कोणी संस्कार किंवा राज्याभिषेक करीत नाही . स्वतः च्या पराक्रमाच्या आधारावर तो जंगलाचा राजा बनतो . 

   न राज्यं नैव राजाऽसित न दण्ड्यो न च दण्डिकः  |
  धर्मेणैव प्रजाः सर्वे रक्षन्ति स्म परस्परम्  ||
३३  ना राज्य, ना राजा, ना अपराधी, ना दंड करणारा, सर्वजण धर्माने वागून परस्परांचे रक्षण करतील . 

मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः |
सिद्धय सिद्धयोनिर्विकारः कर्ता सात्विक उच्यते  ||
३४  जो निःसंग आहे, निर्लेप आहे. ज्याच्या ठिकाणी अहंकार नाही. जो धैर्यवान आहे. ज्याच्या मनात आकांक्षा आणि उत्साह आहे. जो कार्याच्या सिध्दीने वा असिद्धीने किंवा लाभ-हानीने विचलित होत नाही त्यालाच सात्विक कार्यकर्ता म्हटले आहे. 

  रसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा |
  पदभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणमोष्टांग उच्यते ||
३५  छाती, मस्तक, डोळे, वाणी, मन, पाय, हात व गुढगे या आठ अंगांचा नमस्कार म्हणजे साष्टांग नमस्कार होय. 

     लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्तो र्ग्निर्मेदसः क्षयः |
     विभक्त घन गात्रत्वं व्यायामादुप जायते  ||
३६  व्यायामाने अंगी चलाखी येते . काम करण्याचे सामर्थ्य वाढते . अग्नी प्रदिप्त होऊन लठ्ठपणा जातो . सर्व अवयव घट्ट होऊन उठावदार दिसतात . 

     कलिः शयानो भवति संजिहानस्तु द्वापरः  |
     उत्तिष्ठं स्त्रेता भवति कृतं संपद्यते चरन्  ||
                                           चरैवेति चरैवेति  ||
३७  झोपणे हे कलियुगाचे लक्षण आहे . जांभई द्वापरयुगाचे लक्षण आहे . उभे राहणे त्रेतायुगाचे लक्षण आहे . चालायला लागणे सत्ययुगाचे लक्षण आहे . म्हणून चालु लागा, चालायला लागा . 

     यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत  |
     अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्  ||
३८  जेव्हा धर्मप्रभाव कमी होतो, तेव्हा धर्माच्या पुनरुद्धारासाठी या भरतभूमीत मी नवा अवतार धारण करतो . 

     खद्योते द्योतते तावत् यावन्नोदयते शशी  |
     उदिते तु सहस्रांशौ न खद्योते न चन्द्रमाः  ||
३९  चंद्राचा उदय होण्यापूर्वी काजवा चमकत राहतो . सहस्ररश्मी सूर्योदयानंतर कुठला काजवा व कुठला चंद्र !

     उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये  |
     दुग्धं पानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम्  ||
४०  मूर्ख लोक उपदेशामुळे अधिकच भडकतात . दूध जरी पाजले तरी सर्पाचे विषच वाढते . 

    अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
    अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बल घातकः ||
४१ यज्ञात घोडा, हत्ती, वाघ यांचा बळी दिला जात नाही. दुर्बळ बकऱ्याचा बळी दिला जातो. देव सुद्धा दुर्बलांचाच बळी घेतात.  

    बहूनामप्यसाराणां समवायो हि दारुणः |
    तृणैर्विधीयते रज्जुः बध्यन्ते मत्तदन्तिनः ||
४२ दुर्बळांचा समूहही बलवान होऊ शकतो. गवताची दोरी वळून, तिने मदोन्मत्त हत्तींनाही बांधून घालतात. 

    यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः |
    यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफ़ला क्रियाः ||
४३ जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, तेथे देवांचा निवास असतो. जेथे त्यांना मान नसतो तेथे सर्व क्रिया निष्फळ होतात.

    चिन्तनीया हि विपदामादावेव प्रतिक्रिया |
    न कूप खननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे ||
४४ संकट आल्यावर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पूर्वतयारी बरी. घराला आग लागल्यावर विहीर खणणे चांगले नव्हे. 

    यथा चित्तं तथा वाचः यथा वाचः तथा क्रिया |
    चित्ते वाचि क्रियायां च साधूनां एकवाक्यता ||
४५ जसे मनात तसे बोलण्यात, जसे बोलण्यात तसे कृतीत. मन, वाचा व कृती यामध्ये एकरूपता असलेल्यांना सत्पुरुष म्हणतात. 

    त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् |
    ग्रामं जनपदस्यार्थे ह्यात्मार्थे पृथिवीं त्यजेत् ||
४६ कुटुंबाच्या कल्याणासाठी एका व्यक्तीचा त्याग  करावा. गावासाठी कुळाचा व देशासाठी गावाचा त्याग करावा. आत्म्याच्या उन्नतीसाठी जगाचाही त्याग करावा. 

    उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम्  |
    विरक्तस्य तृणं कामः निःस्पृहस्य तृणं जगत् ||
४७ उदार माणूस पैशाला, शूर मरणाला, विरक्त विषयोपभोगांना तर निःस्पृह माणूस जगाला कस्पटासमान मानतो. 

    जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः |
    जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ||
४८ मला चांगले काय ते ठाऊक आहे, पण मला तिकडे ओढ नाही. मला वाईट काय तेही ठाऊक आहे, मात्र ते सोडावेसे वाटत नाही. 

    न जातु काम कामानां उपभोगेन शाम्यति |
    हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभि वर्धते ||
४९ वासनांचा उपभोग घेतल्याने वासना संपत नाहीत. अग्नीत तूप ओतल्यावर तो जसा वाढतो, तशा त्या वाढत जातात. 

    अव्यापारेषु व्यापारं यो नरः कर्तुमिच्छन्ति |
    स तत्र निधनं याति कीलोत्पाटीव वानरः  ||
५० ज्या व्यक्ती अनाठायी कृती करीत राहतात त्या पाचर उपटलेल्या वानराप्रमाणे मृत्यूस पात्र होतात. 

   देशोद्धाराय कर्तव्यं किमपि प्रत्यहं मया  |
  प्रतिज्ञैषा मया कार्या स्वातन्त्रस्य महोत्सवे  ||
५१ आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या या (अमृत ) महोत्सवात देशाच्या उद्धारासाठी मला रोज काहीना काही उपयुक्त कार्य केले पाहिजे अशी प्रतिज्ञा मी करावयास हवी . 

    अत्रापि भारतं श्रेष्ठं जम्बुद्विपे महामुने  |
    यतो हि कर्मभूरेषा ह्यतो न्या भोगभूमयः  ||
५२ हे महामुने ! जंबुद्वीपात भारत श्रेष्ठ आहे. कारण ही कर्मभूमी आहे . तर अन्य भूमी या भोगभूमी आहेत. 

    राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा राष्ट्रगीतं तथैव च  |
    एतानि मानचिह्नानि  सर्वदा हृदि धार्यताम्  ||
 ५३  राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा आणि राष्ट्रगीत ही राष्ट्राची मानचिन्हे हृदयात सदैव धारण करावीत.   

    कन्या वरयते रुपम्  माता वित्तम् पिता श्रुतम्  |
    बान्धवाः कुलमिछन्ति मिष्टान्नं इतरेजनाः  ||
 ५४  मुली रूप पाहतात, आई संपत्ती, वडील ज्ञान पाहतात. मित्र मंडळी कुळ बघतात तर इतरजण सुग्रास भोजन बघतात. 

    शुरोसि कृतविद्योसि दर्शनियोसि पण्डित  |
    यस्मिन् कुले त्वमुत्पन्ने गजस्तत्र न हन्यते  ||
५५  तू शूर आहेस, हुशार आहेस, रूपवान  आहेस. पण ज्या कुळात तुझा जन्म झाला आहे तेथे हत्तीचा वध केला जात नाही. 

    नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले  |
    नुपूरे त्वभिजानामि नित्यं पादाभि वन्दनात्  ||
५६  मी बाहुभूषणे, कर्णभूषणे ओळखत नाही. पैंजण मात्र ओळखतो. कारण नित्य पाय पडण्याने ती ओळखीची झालीत. 

    अमन्त्रं अक्षरं नास्ति नास्ति मूलं अनौषधं  |
    अयोग्यः पुरुषो नास्ति योजकः तत्र दुर्लभः  ||
५७  अर्थ नसलेले अक्षर नसते, औषध नसलेले मूळ नसते व योग्यता नसलेली व्यक्ती नसते. ती योग्य तेथे योजणारा योजक च दुर्लभ असतो. 

    ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः  |
    सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो s भवत्  || 
५८  शंख, भेरी, पणव, आनक, गोमुख एकत्र वाजू लागली. तो अतुलनीय आवाज झाला.  

    धौतिर्बस्तिस्तथा नेतिस्त्राटकं नौलिकं तथा  |
    कपालभातिश्चैतानि षट्कर्माणि प्रचक्षते || हट. प्रदीपिका ||
५९  धौती, बस्ति, नेती, त्राटक, नौली, कपालभाती या ६ शुद्धिक्रिया आहेत. 

    दह्यन्ते ध्यायमानानां धातूनां ही यथा मलः  |
    इन्द्रियाणां दह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात्  ||
६०  धातू जसे अग्नीत तापविल्याने शुद्ध होतात तशी इंद्रिये प्राणाच्या निग्रहाने शुद्ध होतात. 
    
    पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भार्या पुनर्महि |
    पुनरेते न लभ्यन्ते ये शरीरं पुनः पुनः  ||
६१  पैसा, मित्र, पत्नी, राज्य परत मिळेल, पण नष्ट झालेले शरीर परत मिळत नाही. 

    नत्वहं कामये राज्यम् न स्वर्गं नापुनर्भवम्  |
    कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम्  ||
६२  मला राज्याची इच्छा नाही, स्वर्गाला जाण्याचीही नाही वा पुनर्जन्माची नाही. दीनदुबळ्यांचे दुःख नाहीसे व्हावे हीच एक इच्छा  आहे. 

    न कश्चित्  कस्यचित् मित्रं न कश्चित् कस्यचित् रिपुः  |
    कारणेनैव  जायन्ते मित्राणि रिपवो पि वा  ||
६३  कोणी कोणाचा मित्र नाही वा कोणी कोणाचा शत्रू नाही, परिस्थिती प्रमाणे मित्र व शत्रू बनतात. 

    सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम्  |
    न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम्  ||
६४  सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख येतच असते.  दुःख कायम नसते वा सुखही कायम नसते. 

    स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशा नखा नराः  |
    इति विज्ञाय मतिमान्  स्वस्थानं न परित्यजेत्  ||
६५  आपली जागा सोडलेले दात, केस, नखे माणसाला शोभून दिसत नाहीत. न्हणून शहाणी माणसे आपली जागा सोडीत नाहीत. 

    उत्तमो नातिवक्ता स्यात् अधमो बहुभाषते |
    न काञ्चने ध्वनिस्तादृक्  यादृक् कान्स्ये प्रजायते  ||
६६  चांगला माणूस मितभाषी असतो, सामान्य माणूस जास्त बोलतो. सुवर्ण जास्त आवाज करीत नाही, कांशे मात्र वाजत असते. 

विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्तिः परपीडनाय  |
साधोस्तु सर्वम् विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय  ||
६७  विद्या वाद घालण्यासाठी, पैसा मदोन्मत्त होण्यासाठी, शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी अशी दुर्जनांची वृत्ती असते . पण सज्जनांची मात्र ज्ञानासाठी, दानासाठी व दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी ती कामात येते. 
    
     ईशावास्यं इदं सर्वं यत्किञ्च्य् जगत्यां जगत्  |
    तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्  ||
६८  या साऱ्या विश्वावर ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराने दिलेल्याचाच आपण उपभोग घ्यावा. अन्य गोष्टींचा लोभ नको. 


रामाभिषेके जलमाहरंत्या। हस्ताच्युतो हेमघटो युवत्या:।

सोपानमार्गेण करोती शब्दम। ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:।।

६९  रामाच्या अभिषेकासाठी एक युवती एक घट म्हणजे घागर आणत होती. तिच्या हातुन तो निसटला आणि सोपान मार्गावर म्हणजे जिन्यावर त्या भांड्याचा आवाज झाला ठंठं ठठंठं ठठठं ठठंठ:. 


अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ||

७०  रोहित नामक मोठा मासा खूप खोल पाण्यात विहार करून सुद्धा गर्व करीत नाही. पण शफरी मात्र टीचभर पाण्यात असली तरी गर्वाने फुगते.


विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः |

आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते ||

७१ सज्जन माणसे वाईट लोकांच्या संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.


पक्षिणां बलमाकाशो मत्स्यानामुदकं बलम् |

दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ||

७२  आकाशात पक्ष्यांची ताकद काम करते. माश्यांच बळ पाण्यात असते.  राजा हे दुबळ्यांचे बळ होय आणि रडणं ही लहान मुलांची ताकद असते.


लौकिकानां हि साधूनामर्थं वागनुवर्तते |

ऋषीणां पुनराद्यानां वाचमर्थोनुधावति ||

७३  सगळे सत्प्रवृत्त लोक जसं असेल तसे घडेल असे वर्णन करतात. परंतु ऋषी जसे बोलले त्याप्रमाणेच घटना क्रम घडला.


साफल्यतालुकोद्घाटनं कुञ्चिकाद्वयेन च।
प्रथमा दृढसङ्कल्पो द्वितीयाहर्निशं श्रम:।।

७४  यशस्वितेचे कुलूप दोन चाव्यानी  उगडते.  पहिली दृढ संकल्प , आणि दुसरी दिवस रात्र परिश्रम होय.  

अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन |
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः ||

७५ पैसे देऊन औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी ग्रंथसंभार विकत मिळतो, पण ज्ञान मिळत नाही. ते  कष्टाने मिळवावे लागते.

अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं गुरुजनादरः |
स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||

७६  उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.

प्रदोषे दीपक: चन्द्र: प्रभाते दीपको रवि:।
त्रैलोक्ये दीपको धर्म: सुपुत्रो कुल दीपक: ॥

७७  रात्री चन्द्र हा दिवा असतो. [उजेड देतो] पहाटेपासून सूर्य हा दिवा असतो. तिन्ही लोकात धर्म, आपण आपण केलेली सत्कृत्ये ही दिव्याप्रमाणे उपयोगी पडतात. सुपुत्र हा घराण्याला दिवा, मार्गदर्शक  असतो.

विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम् |
अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी ||

७८  जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे नक्की कमीपणा येतो.

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

७९ चिन्ता आणि चिता सारखी आहे, फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर  जाळते.


विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |
आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||

८० शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या दोन्ही विद्या कीर्ति मिळवून देणाऱ्या आहेत.  पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे नेहमी कौतुक होते.

यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |
निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते ||

८१ ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बुद्धी असणारा माणूस देखील स्तुतीला पात्र ठरतो. जसे मोठे वृक्ष नसलेल्या प्रदेशात एरंडसुद्धा वृक्ष म्हणून मिरवतो.

वाच्यं श्रद्धासमेतस्य पृच्छकस्य विशेषतः |
प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवेत्‌ ||

८२ ज्याचा आपल्यावर विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला त्याबद्दल विचारलेले आहे अशा माणसालाच उपदेश सांगावा पण विश्वास नसणाऱ्याला सांगितले तर ते कष्ट व्यर्थ जातील.

अवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वरः |
सन्धिं न यान्ति स्फुटितं लाक्षालेपेन मौक्तिकम् ||

८३ अपमानामुळे तुटलेले प्रेम पुन्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे? जसे फुटलेले मोती लाखेच लेप लावून सांधता येत नाहीत.

श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वांण्हे चापराण्हिकम् |
न हि प्रतीक्षते मृत्युः कृतमस्य न वा कृतम् ||

८४ उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनंतर करायचे काम सकाळीच करावे. कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृत्यु वाट पाहत नाही.

यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |
तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ||

८५ ज्याप्रमाणे कुदळीने खणत राहणाऱ्या मनुष्याला विहिरीचे पाणी मिळते, त्याप्रमाणे गुरूंची निष्ठेने सेवा करणाऱ्या विद्यार्थ्याला गुरुकडे असलेली विद्या मिळते.

विपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गुरो |
भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || 

८६ हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आमच्यावर  सतत संकटे येवोत. त्यामुळे जन्ममृत्यूचा फेरा संपवणारे तुझे दर्शन होईल.

मत्स्य-कुर्म-वराह-पुरूषसिंह-वामनरुपिणं।
क्षत्रियान्तकराम-राघव-कृष्ण-बुद्ध-सुकल्किकम्।।

८७ विष्मणूचे दहा अवतार -  मत्स्य, कुर्म  वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कलंकी .

अज्ञान तिमिरांधस्य, ज्ञानांजन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन,  तस्मै श्री गुरवे नम: ॥ 

 ८८  ज्ञानरूपी अंधाराने झाकलेले माझे डोळे ज्ञानरूपी प्रकाशाने उघडले, अशा माझ्या  गुरुंना मी नमस्कार करतो.

चन्दनं शीतलं लोके ,चन्दनादपि चन्द्रमाः ।
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगतिः ।।
     
८९ चंदन शीतल असते. चंद्र चंदनापेक्षा शीतल असतो. चांगल्या माणसांची संगती मात्र चंदन व चंद्र या दोघापेक्षाही शीतल असते.   

दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ॥  

९० आकाशात एकाच वेळी हजार सूर्य प्रकाशमान झाल्यावर पसरणारा प्रकाश परमेश्वरी प्रकाशाएवढा असेल. 

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं | 
होतारं रत्नधाततम ||

९१  यज्ञाचे नेतृत्व करणारे पुरोहित, देवांना बोलावणारे ऋत्विक आणि रत्नधारी अग्नी यांची मी स्तुती करतो.

सकलं तिमिरं हन्तु प्रज्ञालोकं तनोतु वः।
भूयाद्दीपोत्सवः सोऽयं सर्वमङ्गलकारकः।।

९२ अंधार नाहीसा करून झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशाने प्रकाशित हि दीपावली सर्वमंगलकारी होवो. 



तो. 

जलं तु सर्वभूतानां जीवनाधारसाधनम् ।
जलाभावे भवेन्नाश: जलं रक्षतु मित्रम् ॥

उत्तमे ढमढमे पादे टाराटुरि च मध्यमे ।
पादानाम फुस्कुलि वायु तस्य घाणे न जायते ॥

ब्राह्म मुहूर्त उत्तिष्ठत् जीर्णाजीर्ण निरुपयेत ।
( पहाटे उठावे, पोट तपासावे )



ए आबरुद गंगा ये दिल याद है तुझको ।
उतरा तेरे किनारे यह कारवां हमारा ।।

गोवावाले बीच में, दोनों आखें मीच के ।
थंडे थंडे बियर पियेंगे, दोनों फोटो खिंच के ॥
तुझको लगाउंगी मैं खींच के |

करता करे ना कर सके, गुरु करे सब होय।
सात द्वीप नौ खंड में गुरु से बड़ा ना कोय।।
मैं तो सात संमुद्र की मसीह करु, लेखनी सब बदराय।

सब धरती कागज करु पर, गुरु गुण लिखा ना जाय।


"लाम की मानिन्द गेसू हैं मेरे घन:श्यामके ।

काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।"

["लाम" अक्षरासारखे वळणदार,  मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घन:श्याम मुरारी कृष्णाचे

(फारसीत "ल" अक्षराला  "लाम" असे म्हणतात.)

काफीरच म्हटलं पाहिजे त्यांना,  जे भक्त नाहीत या "लाम"चे!










 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा