उठावणी
नाना पालकर
असे शक्ति अंगात बुद्धी विशाल ।
तुम्ही सर्व हिंदू म्हणा तेच व्हाल ।।
असे केसरीचा खरा हिंदू छावा ।
परी आज का दीनसा तो दिसावा ? ।।१।।
असा देश हा भव्य ऐसा पवित्र ।
दिला ईश्वराने वसे तोहि अत्र ।।
असे हिंदुना तोच आनंद ठेवा ।
म्हणोनी श्रमाने तयाला जपावा ।।२।।
नद्या वाहती पूत येथे अनेक |
असे भू वनश्रीयुता ही विलोक ||
पहा रक्षण्या हे उभे ठाकलेत |
गिरी कैक उत्तुंग या भारतात ||३||
मुनींनी ऋषींनी जिथे वास केला ।
जिथे धूर तो कांचनाचा निघाला ।।
जिथे हिंदू-साम्राज्य मोठे उदेलें ।
तिथे आज का मात्र हे दैन्य आले ।।४।।
तुम्ही ज्या शकांना, हूणांना, ग्रीकांना ।
पुरे जिंकुनी पाणी पाजीयले ना ?
किती म्लेंच्छ उन्मत्त आले तयांना ।
खडे चारिले ! आज का मात्र दैना ? ।।५।।
तुम्हाला उणे काहि ना या जगात |
उठा सर्व काही असे हो बलांत ||
सदा संघशक्तीस वाढीस लावा |
असा यज्ञ हा शक्तिचा चेतवावा || ६ ||
सभा, भाषणे व्यर्थ सारे ठराव ।
नसे आज कार्यात त्या लेश वाव ।।
कृतीचा महा पंथ हा आचरावा ।
कृती बोलू द्या; व्यर्थ डंका नसावा ।।७।।
कशाला वृथा आपुले ध्येय गावे ?
जरी वाटते ना कृतीमाजि न्यावे ।।
जगा ध्येय कार्यातूनी नित्य दावा ।
कृती बोलु द्या, व्यर्थ डंका नसावा ।।८।।
करावी कृती ना मुखें ती वदावी ।
कृतीने कृती भारती वाढवावी ।।
कृतीचा कशाला नगारा झडावा ।
' कृतीहीन ' वाचाळ हिंदू नसावा ।।९।।
खरी देशभक्ती कृतीने दिसावी ।
मुखे वाच्यता भक्तिची त्या नसावी ।।
तुम्हा पाहुनी बंधूंना धीर यावा ।
असा पंथ हा एकतेचा धरावा ।।१०।।
बलानेच राष्ट्रे वरी नित्य येती ।
बलानेच स्वातंत्र्य -गीतांस गाती ।।
समर्थां मिळे मुक्तिचा गोड ठेवा ।
तरी देश सामर्थ्यशाली करावा ।।११।।
अशक्ताविना ना कुणी एक पापी ।
जगी निर्बला व्यक्ति सामान्य कापी ।।
असा पापकर्मी न हिंदू असावा ।
तये शक्तिने शत्रुला वाकवावा ।।१२ ।।
नका संकटांना भिऊं , येऊं द्या तीं ।
समर्थांपुढे संकटें नम्र होती ।।
तरी भीरु हिंदू कधीही नसावा ।
खरा वृत्तिने वीर, खंबीर व्हावा ।। १३ ।।
करूं द्या जगाला सुखनैव निंदा ।
तरी हा न सोडा स्वराष्ट्रीय धंदा ।।
मनीच्या मनी राग त्यांचा गिळावा ।
वरी शांत आतून हिंदू जळावा ।।१४।।
नका सोपवू आपुले कार्य काही
जरी वेळ तुम्हांस कोणावरीही |
नका इच्छु कार्यात घ्याया विसावा
फुका डौल वाणीत केव्हा नसावा ||५८||
नाना पालकर
असे शक्ति अंगात बुद्धी विशाल ।
तुम्ही सर्व हिंदू म्हणा तेच व्हाल ।।
असे केसरीचा खरा हिंदू छावा ।
परी आज का दीनसा तो दिसावा ? ।।१।।
असा देश हा भव्य ऐसा पवित्र ।
दिला ईश्वराने वसे तोहि अत्र ।।
असे हिंदुना तोच आनंद ठेवा ।
म्हणोनी श्रमाने तयाला जपावा ।।२।।
नद्या वाहती पूत येथे अनेक |
असे भू वनश्रीयुता ही विलोक ||
पहा रक्षण्या हे उभे ठाकलेत |
गिरी कैक उत्तुंग या भारतात ||३||
मुनींनी ऋषींनी जिथे वास केला ।
जिथे धूर तो कांचनाचा निघाला ।।
जिथे हिंदू-साम्राज्य मोठे उदेलें ।
तिथे आज का मात्र हे दैन्य आले ।।४।।
तुम्ही ज्या शकांना, हूणांना, ग्रीकांना ।
पुरे जिंकुनी पाणी पाजीयले ना ?
किती म्लेंच्छ उन्मत्त आले तयांना ।
खडे चारिले ! आज का मात्र दैना ? ।।५।।
तुम्हाला उणे काहि ना या जगात |
उठा सर्व काही असे हो बलांत ||
सदा संघशक्तीस वाढीस लावा |
असा यज्ञ हा शक्तिचा चेतवावा || ६ ||
सभा, भाषणे व्यर्थ सारे ठराव ।
नसे आज कार्यात त्या लेश वाव ।।
कृतीचा महा पंथ हा आचरावा ।
कृती बोलू द्या; व्यर्थ डंका नसावा ।।७।।
कशाला वृथा आपुले ध्येय गावे ?
जरी वाटते ना कृतीमाजि न्यावे ।।
जगा ध्येय कार्यातूनी नित्य दावा ।
कृती बोलु द्या, व्यर्थ डंका नसावा ।।८।।
करावी कृती ना मुखें ती वदावी ।
कृतीने कृती भारती वाढवावी ।।
कृतीचा कशाला नगारा झडावा ।
' कृतीहीन ' वाचाळ हिंदू नसावा ।।९।।
खरी देशभक्ती कृतीने दिसावी ।
मुखे वाच्यता भक्तिची त्या नसावी ।।
तुम्हा पाहुनी बंधूंना धीर यावा ।
असा पंथ हा एकतेचा धरावा ।।१०।।
बलानेच राष्ट्रे वरी नित्य येती ।
बलानेच स्वातंत्र्य -गीतांस गाती ।।
समर्थां मिळे मुक्तिचा गोड ठेवा ।
तरी देश सामर्थ्यशाली करावा ।।११।।
अशक्ताविना ना कुणी एक पापी ।
जगी निर्बला व्यक्ति सामान्य कापी ।।
असा पापकर्मी न हिंदू असावा ।
तये शक्तिने शत्रुला वाकवावा ।।१२ ।।
नका संकटांना भिऊं , येऊं द्या तीं ।
समर्थांपुढे संकटें नम्र होती ।।
तरी भीरु हिंदू कधीही नसावा ।
खरा वृत्तिने वीर, खंबीर व्हावा ।। १३ ।।
करूं द्या जगाला सुखनैव निंदा ।
तरी हा न सोडा स्वराष्ट्रीय धंदा ।।
मनीच्या मनी राग त्यांचा गिळावा ।
वरी शांत आतून हिंदू जळावा ।।१४।।
नका सोपवू आपुले कार्य काही
जरी वेळ तुम्हांस कोणावरीही |
नका इच्छु कार्यात घ्याया विसावा
फुका डौल वाणीत केव्हा नसावा ||५८||